Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

येत्या काळात इंधन दरांमध्ये मोठा फरक पडू शकतो.
Petrol Diese Price
Petrol Diese PriceSaam Tv

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या (Crud Oil) किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवर दरवाढीचा दबाव येत असल्याचं दिसून येत आहे. मंगळवारी कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरच्या पुढे गेली. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही. (Petrol Diesel Latest Price Today)

Petrol Diese Price
30 लाखांचे सोने असलेली बॅग एसटीतून लंपास; पुण्यातील व्यावसायिकाला साकोलीत गंडा

भारतीय पेट्रोलियम कंपन्यानी मंळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. युक्रेन संकटामुळे रशियन तेलावरील बंदी वाढवली जात आहे. अशा परिस्थितीत स्वस्त दरात कच्चे तेल रशियाकडून मिळत आहे.

भारतीय तेल कंपन्या ही ऑफर नाकारू इच्छित नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, रिलान्स इंडस्ट्रीज, नायरा एनर्जी या कंपन्या रशियाकडून तेल आयात वाढवण्याच्या दिशेनं वेगानं पाऊल उचलंत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात इंधन दरांमध्ये मोठा फरक पडू शकतो.

Petrol Diese Price
5 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी रंगेहात पकडला; बीड जिल्ह्यात खळबळ

दरम्यान, आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारला कठीण जाणार आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com