Petrol Diesel Price : आज पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की, घटल्या? झटपट चेक करा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv

Petrol Diesel Latest Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले. आज, यूपी आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किंमतीत बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये इंधनाच्या किमती आजही स्थिर आहेत.

Petrol Diesel Price
Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुके अन् थंडीची लाट; ऑरेंज अलर्ट जारी

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे आज पेट्रोल 0.24 पैशांनी महागले असून 97.00 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 0.21 पैशांनी वाढून 90.14 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 0.2 पैशांनी स्वस्त होऊन 96.56 रुपयांवर पोहोचले, तर डिझेल 0.2 पैशांनी घसरून 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. पाटण्यामध्ये आज पेट्रोल 0.35 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लिटर तर डिझेल 0.32 पैशांनी वाढून 94.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price
kalsubai shikhar : कळसुबाई शिखरावर रेकॉर्डब्रेक गर्दी; अपघातांचा धोका

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com