कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचे दर

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम होत आहे.
कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचे दर
Petrol Diesel News,Saam TV

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत (Crud Oil) मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम होत आहे. गुरूवारी सकाळी आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव प्रति बॅरेल 122 डॉलरपर्यंत पोहचला. कच्च्या तेलात आलेल्या तेजीमुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel) आणखी वाढू शकतात. असा इशारा आयबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. (Petrol Diesel Latest Price Today)

Petrol Diesel News,
Bhima Koregaon Case : मुख्यमंत्र्यांसह पाच पक्षांच्या प्रमुखांना आयोगाचं समन्स

दरम्यान, गुरूवारी कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल 122 डॉलरपर्यंत पोहचल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांची इंधनाचे दर जाहीर केले आहे. आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर कच्चा तेलाचे भाव खाली आले नाहीत तर इंधनाचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता, मात्र कच्चा तेलाच्या वाढत्या किमतींनी पेट्रोलियम कंपन्यांवर पुन्हा दर वाढवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

Petrol Diesel News,
मास्क नसेल तर विमान प्रवास करू दिला जाणार नाही; काय आहेत नवीन गाइडलाइन्स?

गुरूवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com