Petrol Diesel: राजस्थानसह 'या' राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam Tv

नवी दिल्ली - सोमवारी पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 2.72 टक्क्यांनी वाढून 87.46 डॉलर प्रति बॅरल झाली आहे, तर WTI प्रति बॅरल 81.62 डॉलरवर आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Price In India)

राजस्थानमध्ये (Rajasthan) पेट्रोल 0.51 रुपयांनी वाढून 108.58 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 0.46 रुपयांनी वाढून 93.81 रुपये प्रति लिटर झाले आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल 0.14 रुपयांनी वाढून 96.77 रुपये, तर डिझेल 0.13 रुपयांनी वाढून 89.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. दुसरीकडे बिहारमध्ये पेट्रोल 0.36 रुपयांनी स्वस्त झाले आहे. येथे पेट्रोलची नवीन किंमत 108.87 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेल 0.34 रुपयांच्या घसरणीसह 95.54 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

Petrol Diesel Price Today
Pune CNG Price : पुणेकरांच्या खिशाला कात्री; सीएनजी दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. (Petrol Diesel Price Today)

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com