Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता ‘या’ शहरात डिझेलचीही सेंच्युरी कायम

देशात पेट्रोलच्या भावाने या अगोदरच शंभरी पार केली आहे. ते रेकॉर्ड ब्रेक स्तरावर आलं आहे
Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता ‘या’ शहरात डिझेलचीही सेंच्युरी कायम
Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता ‘या’ शहरात डिझेलचीही सेंच्युरी कायम Saam Tv

मुंबई : देशात पेट्रोलच्या भावाने या अगोदरच शंभरी पार केली आहे. ते रेकॉर्ड ब्रेक स्तरावर आलं आहे. त्या मागोमाग आता डिझेलच्याही भावात शंभरी पार केली आहे. अगोदरच महागाईने हैराण झालेल्या सामान्यांच्या खिशाला आता इंधन भाववाढीची चांगलीच कात्री लागली आहे. मुंबई मध्ये आज पेट्रोलच्या भावात २९ पैसे वाढ झाली आहे.१०९.८३ रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तर डिझेलच्या भावात ३७ पैशांची वाढ झाली आहे. १००.२९ रुपयांवर येऊन पोहोचले आहे.

हे देखील पहा-

देशातील आज महत्त्वाच्या शहरात पेट्रोल आणि डिझेल भाव पहा-

दिल्ली मध्ये पेट्रोल हे १०३.८४ तर डिझेल ९२.४७ इतके झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल १०९.८३ तर डिझेल भाव १००.२९ इतके झाले आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल भाव १०४.५२ तर डिझेल भाव ९५.५८ एवढे करण्यात आले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल भाव १०१.२७ तर डिझेल भाव ९६.९३ एवढे झाले आहे. जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता ‘या’ शहरात डिझेलचीही सेंच्युरी कायम
अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर प्रथमच अमेरिका तालिबानशी चर्चा करणार...

यातच पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु, उत्पादन मात्र कमीच आहे. काही दिवसाअगोदर झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये रोज केवळ ४ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे कच्च्या तेल्याच्या भावामध्ये वाढ होत आहे.

जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या भाव वाढतात. त्यावेळेस देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये वाढ होणे, हे सामान्य बाब आहे. देशात २६ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव १०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू- कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यात पेट्रोलचे भाव हे १०० रुपये प्रति लिटरच्या पार झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.