Petrol-Diesel Price : पेट्रोल-डीझेल लवकरच स्वस्त होणार, मोदी सरकारचा काय आहे नवा प्लान?

मोदी सरकार लवकरच वाहनधारकांना मोठं गिफ्ट देणार आहे. पेट्रोल - डीझेलच्या किंमती कमी करण्याचा प्लान आहे.
Petrol diesel price may be cut soon/file
Petrol diesel price may be cut soon/filesaam tv

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डीझेलच्या किंमतींबाबत केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल-डीझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. वैश्विक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे मार्जिनही वाढले आहे. त्यामुळे त्यांना तोटा न होता त्यांचा फायदा होत आहे. ही बाब लक्षात घेता सरकार लवकरच पेट्रोल आणि डीझेलचे दर प्रतिलीटर दोन रुपयांनी कमी केले जाऊ शकतात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पेट्रोल - डीझेलच्या (Petrol - Diesel) किंमती कमी झाल्या तर मे २०२२ नंतर ही इंधन दरात प्रथम झालेली कपात असेल. मे मध्ये सरकारने पेट्रोल-डीझेलवरील अबकारी करात कपात केली होती. त्यावेळी सरकारने पेट्रोलवर ८ रुपये प्रतिलीटर, तर डीझेलवरील अबकारी करात ६ रुपये प्रतिलीटर कपात केली होती.

Petrol diesel price may be cut soon/file
Breaking News : सोशल मीडिया कंपन्यांविरोधात मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; तयार केला मोठा प्लॅन

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलियम कंपन्यांना पुन्हा एकदा पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये मार्जिन मिळण्यास सुरुवात झाली. रिपोर्टनुसार, पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोलवर ६ रुपये प्रतिलीटर, तर डीझेलवर १० रुपये प्रतिलीटरपर्यंत मार्जिन मिळू लागला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय चलन रूपया आणि कच्च्या तेलाच्या किंमती सध्याच्या पातळीवर कायम राहिल्यास सरकार पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतींमध्ये प्रतिलीटर दोन रुपयांनी कपात करू शकतं. मात्र, याबाबत कोणता निर्णय घेण्याआधी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पुढील काळात किती चढ-उतार होऊ शकतो, याचाही अंदाज घ्यावा लागणार आहे. सध्या तरी तेलाच्या किंमती रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळीच्या तुलनेत खूप कमी झाल्या आहेत.

Petrol diesel price may be cut soon/file
Soniya Gandhi on Modi Gov. | मोदी सरकार आत्ममग्न सरकार आहे : सोनिया गांधी

सरकारने (Modi Government) मंगळवारी विंडफॉल टॅक्स म्हणजेच कंपन्यांना मिळणाऱ्या फायद्यातील हिस्सा कमी करून देशांतर्गत बाजारात आता तेलाच्या किंमतींवर असलेला वाढता दबाव कमी झाल्याचे संकेत दिले आहेत.

सरकारने पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतींमध्ये प्रतिलीटर दोन रुपयांची कपात केली तर, नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळेलच, पण आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुकांमध्येही सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं जाऊ शकतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com