Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले; 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागलं

सलग दुसऱ्या दिवशी कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली. ज्याचा परिणाम आज अनेक शहरांमध्ये जारी झालेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे.
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam tv

Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार होत आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली. ज्याचा परिणाम आज अनेक शहरांमध्ये जारी झालेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी उत्तरप्रदेशातील अनेक शहरांमध्ये आज सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये बदल केले आहेत. (Latest Marathi News)

Petrol Diesel Latest Price
Dance Video : हळदीत बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

सरकारी तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (ग्रेटर नोएडा) पेट्रोलच्या दरात २४ पैशांनी तर डिझेलच्या (Diesel)  दरात २१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे लखनौमध्ये पेट्रोल ४ पैशांनी स्वस्त होऊन ९६. ४४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल ३ पैशांनी घसरून ८९.६४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

एकीकडे उत्तरप्रदेशात इंधनाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी दुसरीकडे मुंबई दिल्लीसारख्या देशातील पाच प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईसह दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Latest Price
FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर; बेल्जियम, कॅनडा स्पर्धेबाहेर, क्रोएशिया बाद फेरीत

कच्चा तेलाच्या दराबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या २४ तासांत आंतराराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल दीड डॉलरने वाढले आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत ८६.८८ डॉलरवर पोहचली आहे. पेट्रोल डिझेलचे दर कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात, जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com