Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

इंधन दरवाढीची झळ सहन करणाऱ्या वाहनधारकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam TV

Petrol Diesel Prices Today : इंधन दरवाढीची झळ सहन करणाऱ्या वाहनधारकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर झाला आहे. कच्चा तेलाचे दर कमी होताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. (Latest Marathi News)

Petrol Diesel Latest Price
FIFA World Cup : फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर; स्पेन वर्ल्डकपमधून बाहेर, मोरक्कोने रचला इतिहास

काय आहे आजचा पेट्रोल डिझेलचा भाव?

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल  (Petrol) ३६ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी स्वस्त झाले आहेत. याशिवाय लखनौमध्येही पेट्रोलच्या दरात १८ पैशांची तर डिझेलच्या दरात १७ पैशांची घसरण झाली. बिहारची राजधानी पाटणा येथे सकाळी पेट्रोलचा दर ५० पैशांनी घसरून १०७. २४ रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर ४७ पैशांनी घसरून ९४.९४ रुपये प्रति लिटरवर आला आहे.

याशिवाय गुरुग्राममध्येही आज पेट्रोल ६१ पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे गुरूग्राममधील पेट्रोलचा दर ९६.७७ रुपयांवर आला आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलही (Diesel) स्वस्त झालं आहे. डिझेलचे दर ५९ पैशांनी घसरून प्रतिलीटर ८९. ६५ रुपयांवर आले आहे. दुसरीकडे दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत.

Petrol Diesel Latest Price
CM शिंदेंच्या फोननंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट; सीमावादावर केलं मोठं भाष्य

जर आपण कच्च्या तेलाबद्दल बोललो तर गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत सुमारे ३ डॉलरची घसरण दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलरच्या खाली आली आहे. ब्रेंट क्रूड आज सकाळी २ पेक्षा जास्त डॉलरने घसरले आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com