Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं; झटपट चेक करा आजचे दर

Petrol Diesel Price Today 31 May 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam TV

Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. WTI क्रूड प्रति बॅरल 69.56 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची किंमत देखील 3.53 डॉलरने खाली आली आहे आणि प्रति बॅरल 73.54 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.

Petrol Diesel Latest Price
Udayanraje Bhosale News : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निघालेल्या दुचाकी रॅलीत उदयनराजे भोसलेंची स्टाईलमध्ये बुलेटस्वारी!

महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 77 पैशांनी महागलं आहे. बिहारमध्ये आज पेट्रोल (Petrol) 51 पैशांनी आणि डिझेल (Diesel) 48 पैशांनी स्वस्त झालं आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 41 पैशांनी तर डिझेल 42 पैशांनी कमी झाले आहे. मध्य प्रदेश, पंजाब, केरळ आणि गोव्यासह इतर काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातही पेट्रोलच्या दरात 41 पैशांनी तर डिझेलच्या दरात 40 पैशांनी वाढ झाली आहे. झारखंड, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Latest Price
Lonavala News: माझ्या नवऱ्याची कार दरीत कोसळलीये... लोणावळा पोलिसांना आलेल्या कॉलमुळे मोठा अनर्थ टळला

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com