Petrol Diesel Prices : कच्चा तेलाच्या दरात पुन्हा घसरण; पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार?

कच्चा तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol) नवीन दर जारी केले आहेत.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार होत आहे. आज म्हणजेच सोमवारी देखील कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर 80 डॉलरच्या खाली आले. दरम्यान, कच्चा तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol) नवीन दर जारी केले आहेत. (Petrol Diesel Price In Maharashtra)

Petrol Diesel Price Today
Astrology : ‘या’ राशीच्या लोकांची जुनी इच्छा होणार पूर्ण; वाचा आजचे राशीभविष्य

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल (Diesel)  3 पैशांनी स्वस्त झालं आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोलचे दर 18 पैशांनी घसरले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये देखील पेट्रोलचे दर 5 पैशांनी कमी झाले आहेत. (Latest Marathi News)

जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल सुमारे तीन डॉलरने घसरल्या आहेत. याचा परिणाम गुरुवारी सकाळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर झाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी उत्तरप्रदेशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. तर बिहारमध्ये इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price In mMaharashtra Today)

Petrol Diesel Price Today
भयंकर! धावत्या ट्रेनखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

दुसरीकडे देशातील पाच प्रमुख महानगरात पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. मुंबई आणि दिल्लीत पेट्रोलचे भाव जैसे थे आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. पेट्रोलचे दर 65 तर डिझेलचे दर 66 पैशांनी कमी झाले होते. दरम्यान, कच्चा तेलाच्या दरात अशीच घसरण सुरू राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे 5 रुपयांनी कमी होईल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com