सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पेट्रोल डिझेलने गाठला उच्चांक
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पेट्रोल डिझेलने गाठला उच्चांक Saam Tv

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पेट्रोल डिझेलने गाठला उच्चांक

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव परत वाढले

वृत्तसंस्था : देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव परत वाढले आहेत. डिझेलचे भाव आजच्या दिवशी 93.52 रुपये प्रति लीटरच्या विक्रमी उच्चांकावर येऊन पोहोचली आहे. दिल्लीत तेलाच्या भावात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर मुंबईत पेट्रोल भाव हा 110.75 रुपये प्रति लीटर झाले आहे.

हे देखील पहा-

ताज्या भाववाढीमुळे पेट्रोलचे भाव आता दिल्लीमध्ये 104.44 रुपये प्रति लीटरवरून 104.79 रुपये करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये डिझेलचे भाव वाढून 101.40 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. कोलकातामध्ये इंधनाचे भाव वाढवण्यात आले आहेत. जिथे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता अनुक्रमे 105.43 रुपये आणि 96.63 रुपये प्रति लीटर करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका! पेट्रोल डिझेलने गाठला उच्चांक
चीनचं पुन्हा नवं नाटक, अरुणाचल प्रदेश आमचा अविभाज्य भाग - भारत

चेन्नईमध्ये लोकांना 1 लिटर पेट्रोलसाठी 102.10 रुपये खर्च करावे लागत आहेत, तर तामिळनाडूची राजधानी डिझेलचे भाव 97.93 रुपये प्रति लीटर करण्यात आले आहे. स्थानिक करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव राज्यानुसार बदलत असतात.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.