Petrol Diesel Price Today: आनंदाची बातमी! पेट्रोल- डिझेलच्या दरात घट; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Petrol Diesel Rate: जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत घट झाली आहे.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam TV

Petrol Diesel Rate: रोज सकाळी सहा वाजता देशभरात कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. आजचे दर देखील समोर आले आहेत. आज नागरिकांच्या खिशाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारण जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर घटले आहेत. (Latest Petrol Diesel Rate)

नोएडा आणि ग्रेटर नोएडा या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे (Diesel) दर घसरले आहेत. येथे पेट्रोल २८ पैशांनी स्वस्त झाले असून ९६.९४ रुयपे किंमतीवर पोहचले आहे. तर डिझेल २६ पैशांनी स्वस्त झाले आहे. गाझियाबादमध्येही पेट्रोलच्या दरात बदल झाला आहे. येथे पेट्रोल ९६.५८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. प्रयागराजमध्येही कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. येथे ६२ पैशांनी पेट्रोल स्वस्त होऊन ९६.६६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल ६१ पैशांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत ८९.८६ रुपये प्रति लिटर झाली आहे.

Petrol Diesel Prices
Saamana Editorial on Modi Government: 'राष्ट्रीय संवेदनशील मुद्यांवर पंतप्रधान 'चूप' असतात'; पुलवामावरून दैनिक 'सामना'तून हल्लाबोल

लखनऊ, बिहार, पटणा या ठिकाणी देखील पेट्रोलच्या किंमती घसरल्या आहेत. राजस्थानमध्ये मात्र कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. येथे पेट्रोल १९ पैशांनी महागलं आहे. पेट्रोल (Petrol) १०८.७६ रुपये प्रति लिटर तर डिझेल १७ पैशांनी महागले असून ९३.८९ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Prices
Raigad Fort Shivrajyabhishek रायगड स्वच्छ कसा राहिलं? 'त्या' ताईने सांगितलेलं सर्वांनीच ऐकण्यासारखं

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com