इंधन दरवाढीचा परत झटका! पुन्हा पेट्रोल महागले (पहा व्हिडिओ)

दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर झाले आहे तर डिझेलच्या दरामध्ये काहीही बदल झालेली नाही.
इंधन दरवाढीचा परत झटका! पुन्हा पेट्रोल महागले (पहा व्हिडिओ)
इंधन दरवाढीचा परत झटका! पुन्हा पेट्रोल महागले (पहा व्हिडिओ)Saam Tv

आज सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे Petrol नवीन दर जारी केले आहेत. गुरुवारी नंतर आज पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. दिल्लीमध्ये Delhi आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले आहे तर मुंबईमधील Mumbai पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर झाले आहे तर डिझेलच्या दरामध्ये काहीही बदल झालेली नाही. मुंबईमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी नागरिकांना आता १०७.८३ रुपये मोजावे लागणार आहे.

आतापर्यंत ४१ वेळा दिल्लीमध्ये मे महिन्यापासून इंधनदरवाढ करण्यात आली आहे. या ४१ दिवसांमध्ये पेट्रोलचे १०.७९ रुपयांनी तर डिझेलचे दर ८.९९ रुपयांनी महागले असल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यामध्येच ९ वेळा इंधनरदवाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ झाली होती. मे महिन्यापासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या २ महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे १० रुपयांनी वाढले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com