EPFO: पीएफ खातेधारकांना ७ लाखांचा मोफत विमा, जाणून घ्या काय आहे योजना?

सध्या देशात ईपीएफओचे ४.५० कोटी पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्याचे व्याजदर जास्त आहे. तर दुसरीकडे अजुनही फायदे आहेत.
EPFO: पीएफ खातेधारकांना ७ लाखांचा मोफत विमा, जाणून घ्या काय आहे योजना?
EPFOSaam Tv

नवी दिल्ली: ईपीएफओच्या (EPFO) डिपॉजीटवरील व्याजदर कमी केल्यामुळे ईपीएफओ सध्या चर्चेत आले आहे. ईपीएफओचे देशात करोडो सदस्य आहेत. सध्या देशात ईपीएफओचे ४.५० कोटी पेक्षा जास्त सदस्य आहेत. एका बाजूला याचे व्याजदर जास्त आहे. तर दुसरीकडे अजुनही फायदे आहेत. आपण ईपीएफओचे सदस्य असतो, पण आपल्याला याचे फायदे माहित नसतात. असाच एक मोठा फायदा आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे.

ईपीएफओच्या 'एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम'बद्दल आपल्याला माहिती नसेलतर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. या योजनेअंतर्गत खातेधारकांना ७ लाख रुपयांपर्यंत मोफत विमा संरक्षण मिळते. म्हणजेच सदस्यांना मोफत विमा मिळणार आहे.

EPFO
नोकरदारांना मोठा झटका; PF वरील व्याजदर ४० वर्षांतील नीचांकीवर

मृत्यू विमा संरक्षण

ईपीएफओ (EPFO) च्या 'एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम' एक विशेष प्रकारची मृत्यू संरक्षण विमा आहे. या योजनेचा कोणही फायदा घेत नाही, पण ही योजना गरजूंना फायद्याची आहे. या योजनेअंतर्गत, एखाद्या पीएफ खातेधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्या खात्याच्या नोंदणीकृत वारसास ही रक्कम दिली जाते.

या योजनेअंतर्गत ईपीएफओच्या (EPFO) खातेधारकांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.तर जास्ती जास्त ७ लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. ही रक्कम खाते धारकाच्या वारसदारांना मिळते.

जर या योजनेत खाते धारकाने त्याच्या वारसाची नोंद केली नसेल, तर या विम्यातील रक्कम सदस्याची जीनवसाथी किंवा त्याच्या मुलाला मिळते, पण क्लेम करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे.

EPFO
मोठी बातमी! कॉंग्रेस नेत्याने अचानक राजकारणातून घेतला ब्रेक; कारण....

जर तुम्ही ईपीएफओ (EPFO) चे सदस्य असाल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज नाही. प्रत्येक पीएफ सदस्याला त्याच्या पीएफ खात्यात लवकरात लवकर ई-नामांकन करावे लागणार आहे. जेणेकरून आपल्या वारसांना विमा संरक्षणाचा लाभ घेताना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

त्यामुळे वारसांचे ई नामांकन करुन घेणे गरजेचे आहे. या योजनेचा फायदा ईपीएफओ च्या सदस्यांना होतो. पण ईपीएफओ सदस्य या योजनेचा फायदा घेत नसल्याचे दिसत आहे.

EPFO
Monkey pox: ५ वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे, जगभरात या नव्या आजाराने उडवलीय झोप

असे भरा ईपीएफ'मध्ये ई-नॉमिनेशन

सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.epfindia.gov.in/ जा

‘Services’ पर्यायावर क्लिक करा आणि त्याअंतर्गत ‘For Employees’या पर्यायावर क्लिक करा

तुम्हाला नव्या पेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल, त्यानंतर ‘Member UAN/Online Service’पर्यायावर क्लिक करा

Manage Tab अंतर्गत E-Nomination ला सिलेक्ट करा. असे केल्याने स्क्रीनवर Provide Details बटण समोर येईल, त्यानंतर Saveवर क्लिक करा

आता फॅमिली डेक्लेरेशनसाठी Yes वर क्लिक करा, त्यानंतर Add family details वर क्लिक करा

इथे एकूण रक्कम शेअर करण्यासाठी Nomination Detailsवर क्लिक करा, त्यानंतर Save EPF Nomination वर क्लिक करा

त्यानंतर OTP जनरेट करण्यासाठी E-sign वर क्लिक करा. आता आधारमध्ये लिंक्ड रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.

असे केल्यानंतर तुमचे ई-नॉमिनेशन ईपीएफओवर रजिस्टर्ड होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com