
Odisha News: ओडिशाच्या (Odisha) बारीपाडा येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात वीज खंडित झाल्याचा वाद सुरू असतानाच आता ओडिशातील आणखी एक प्रकरण चर्चेत आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu, President of India)यांच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढल्यामुळे फार्मासिस्टला आपली नोकरी गमवावी लागली आहे. मयूरभंजच्या मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने (CDMO) या फार्मासिस्टला फोटो काढल्या याप्रकरणी निलंबित केले आहे.
एका अधिकाऱ्याने सोमवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सीडीएमओ डॉ. रुपभानू मिश्रा यांनी फार्मासिस्ट जशोबंत बेहरा यांना राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केल्याबद्दल निलंबित केले आहे. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरबरोबर सेल्फी काढल्यामुळे सरकारी नोकरी गमवावी लागणाऱ्या फार्मासिस्टचे नाव जशोबंत बेहरा असे आहे.
जशोबंत बेहरा हे 5 मे रोजी सिमिलीपाल नॅशनल पार्कच्या भेटीदरम्यान राष्ट्रपतींच्या वैद्यकीय पथकात तैनात होते. बेहरा यांनी सांगितले की, 'फक्त लक्षात राहावे आणि आनंदासाठी मी माझ्या फेसबुक अकाउंटवर काही फोटो टाकले होते. हे करण्यामागे माझा दुसरा कोणताही हेतू नव्हता. हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या हवाई दलाच्या काही जवानांची मी फक्त तोंडी परवानगी घेतली होती.'
तसंच, 'राष्ट्रपतींसारखे महान व्यक्तिमत्व जिल्ह्यात आले होते आणि मी हेलिपॅडवर ड्युटीवर होतो त्यामुळे आठवण ठेवण्यासाठी मी हे फोटो काढले होते. मी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून फोटो काढून टाकले आहेत. मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याने हेलिकॉप्टरजवळून हे फोटो काढण्यात आले होते.' असे देखील जशोबंत बेहरा यांनी सांगितले. हेलिकॉप्टरसोबतच्या फोटोंमुळे नोकरी गमवावी लागलेला हा अधिकारी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.