उडत्या विमानात ठेवता येणार शारीरिक संबंध; एका तासासाठी मोजावे लागतील लाखो

या सेवेसाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत जोडप्याला फक्त 45 मिनिटे मिळणार आहेत.
उडत्या विमानात ठेवता येणार शारीरिक संबंध; एका तासासाठी मोजावे लागतील लाखो
उडत्या विमानात ठेवता येणार शारीरिक संबंध; एका तासासाठी मोजावे लागतील लाखोSaam TV

अमेरिकेतील एका कंपनीकडून विशेष चार्टर प्लेन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत जोडपे उडत्या विमानात शारीरिक संबंध ठेवू शकते. अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू करण्यात आलेल्या या 'लक्झरी सेवे'मध्ये 'लव्ह क्लाउड जेट चार्टर' ही कंपनी या जोडप्यांना हवेत शारीरिक संबंध ठेवण्याची संधी देणार आहे. लव्ह क्लाउड जेट चार्टर कंपनीकडून ही सेवा घेण्यासाठी प्रत्येक जोडप्याला ९९५ यूएस डॉलर म्हणजेच सुमारे ७३ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

या सेवेसाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. या अंतर्गत जोडप्याला फक्त 45 मिनिटे मिळणार आहेत. विमानाच्या टेकऑफनंतर पायलट हवेतच राहील तर त्याचे ग्राहक विमानाच्या मागील भागात आनंद घेत राहतील. विमानात आसनासह आरामदायी बेड बनवण्यात आला आहे. दरम्यान, एखाद्या जोडप्याला दीड तास हवेत राहायचे असेल, तर त्यांना थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असणार आहे.

उडत्या विमानात ठेवता येणार शारीरिक संबंध; एका तासासाठी मोजावे लागतील लाखो
पाकिस्तानी पोलीस मुलावर लावतोय 50 हजारांची बोली, कारण...!; पाहा Video

विमानातील जोडपे विमानाने उड्डाण केल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच सीट बेल्ट काढू शकतात. एका रिपोर्टनुसार, विमानाचा पायलट अँथनी ब्लॅक याने सांगितले आहे की, हे सिंगल पायलट प्लेन आहे आणि मी कॉकपिटमधून बाहेर पडू शकत नाही, मलाही सेक्स करायला आवडते, पण मला विमान उडवायला जास्त आवडते. .

ब्लॅक यांनी अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत अनेक नवविवाहित जोडप्यांव्यतिरिक्त अनेक वृद्धांनीही कंपनीची सेवा घेतली आहे. लव्हक्लाउड आणि त्यांची फ्लाइट नेवाडामध्ये जवळपास सात वर्षांपासून अशा सुविधा पुरवत आहेत. यामध्ये रोमँटिक डिनर आणि अगदी इन-एअर विवाहसोहळ्यांचा समावेश आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com