स्वप्न पूर्ण झालं! आई-वडीलांना आपल्याच फ्लाईटमध्ये पाहून पायलट भावूक; पाहा Video

Pilot Kamal Kumar Video : हा व्हिडिओ पोस्ट करत कमलने लिहिले की, मी उड्डाण सुरू केल्यापासून या क्षणाची वाट पाहत होतो आणि शेवटी मला संधी मिळाली.
Kamal Kumar Pilot A320
Kamal Kumar Pilot A320Instagram/desipilot11_

नवी दिल्ली: आपल्या मुलाला यशस्वी होताना, उंच झेप घेताना पाहणं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. जर मुले त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होत असतील तर त्यांच्या पालकांसाठी तो सर्वात खास क्षण असतो. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. मुलगा विमान पायलट (Pilot) आहे. या फ्लाइटमध्ये त्याचे आई-वडील प्रवासी म्हणून आले होते. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा त्या विमानाचा पायलट आहे, हे पालकांना माहीत नव्हते. यानंतर जे झाले ते पाहून इतर प्रवाशीही भावूक झाले. (Jaipur Pilot Viral Video)

हे देखील पाहा -

हा खास व्हिडिओ पायलट कमल कुमार (Kamal Kumar - Pilot A320) यांनी पोस्ट केला आहे. जवळपास १५ सेकंदांच्या या व्हिडिओतली प्रत्येक फ्रेम, प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे. कमल कुमार यांची आई फ्लाइटमध्ये प्रवेश करताच समोर त्यांना त्यांचा मुलगा दिसतो. पायलटच्या ड्रेसमध्ये मुलाला पाहून आई आश्चर्यचकित झाली. यानंतर कमल हे त्यांच्या आई-वडिलांना घेऊन कॉकपिटमध्ये गेले, जिथे त्यांनी फोटोज क्लिक केले.

Kamal Kumar Pilot A320
Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच

हा व्हिडिओ पोस्ट करत कमलने लिहिले की, मी उड्डाण सुरू केल्यापासून या क्षणाची वाट पाहत होतो, आणि शेवटी मला त्यांना जयपूरला घरी नेण्याची संधी मिळाली, ही एक वेगळीच अनुभूती आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून जवळपास २० लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. नेटीझन्सकडून या व्हिडिओ खूप पसंती मिळत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com