अप्रतिम! प्रथमच दिसला गुलाबी बिबट्या; पहा Photo!

खरोखरच जंगलाचे जग खूप अनोखे आहे. जंगलात एवढे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी राहतात की आपल्याला अजून त्याची माहिती देखील नसेल.
अप्रतिम! प्रथमच दिसला गुलाबी बिबट्या; पहा Photo!
अप्रतिम! प्रथमच दिसला गुलाबी बिबट्या; पहा Photo!Saam Tv

खरोखरच जंगलाचे जग खूप अनोखे आहे. जंगलात एवढे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी राहतात की आपल्याला अजून त्याची माहिती देखील नसेल. परंतु काही प्राणी इतके दुर्मिळ Rare असतात. त्यांना जंगलात शोधणे कठीण असते. अशा प्रजातींना सामान्यतः धोक्यात आलेले प्राणी मानतात. पण ते जंगलात एकदा दिसले की, लोकांना आनंद होतो. राजस्थान मध्ये असाच एक प्राणी जंगलात दिसला आहे, जो बराच काळ पासून दिला नाहीये.

एका रिपोर्टनुसार, यावेळी जंगलात प्रथमच गुलाबी बिबट्या (Pink Leopard) दिसला आहे. काहींना तर गुलाबी रंगाचा बिबट्या असतो असा विचार देखील केला नसेल. पण हो! हा बिबट्या दक्षिण राजस्थानच्या Rajsthan अरवली डोंगराळ भागात रणकपूर परिसरात दिसला आहे.

एका अहवालानुसार, यापूर्वी २०१२ आणि २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गुलाबी बिबट्या दिसला होता. पांढरा बिबट्या भारतात पहिल्यांदा १९१० मध्ये दिसला होता. तेव्हापासून फक्त सामान्य आणि काळा बिबट्या Black Leopard दिसत होता.

रणकपूर आणि कुंभलगढच्या लोकांनी असेही सांगितले की, त्यांनी त्यांच्या भागात एक मोठी गुलाबी रंगाची मांजर (Big Cat) अनेकदा पाहिली आहे. उदयपूरचे वन्यजीव संरक्षक आणि छायाचित्रकार हितेश मोटवानी यांनी ही छायाचित्रे क्लिक केल्याचे सांगितले आहे. ही छायाचित्रे क्लिक करण्यासाठी हितेश चार दिवस प्रवास करत होते. त्यानंतर त्यांना हा सुंदर गुलाबी बिबट्या दिसला. म्हणतात की, आनुवंशिकतेमुळे बिबट्याचा रंग गुलाबी होतो, पण गुलाबी बिबट्या हे क्वचितच दिसतात.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com