Pizza हट्टामुळे 18 वर्षाच्या मुलीने संपविले जीवन...
Pizza हट्टामुळे 18 वर्षाच्या मुलीने संपविले जीवन... Saam Tv

Pizza हट्टामुळे 18 वर्षाच्या मुलीने संपविले जीवन...

उत्तर प्रदेशच्या ललितपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या ललितपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी नर्सिंगच्या एका विद्यार्थीनीने केवळ या कारणामुळे आपला जीव दिला Suicide आहे. कारण आईने तिला पिझ्झासाठी Pizza थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितली होती. या विद्यार्थीनीचा वाढदिवस २ दिवसाअगोदर साजरा करण्यात आला होता. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमकरिता पाठवण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तलाबपुरा परिसरामध्ये राहणारे मोहनलाल सोनी यांची मुलगी शिखा सोनी (वय-१८) हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिखाचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. शिखाने आपल्या आईकडे पिझ्झा Pizza मागितला होता. आईने पिझ्झासाठी थोडे वेळ थांबण्यास सांगितले होते.

यामुळे नाराज झालेल्या शिखाने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत मुलीचे वडील मोहन लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार की, तिने नर्सिंगचा कोर्स केला होता. ती जिल्हा हॉस्पिटलमध्ये ३ महिन्यांचे ट्रेनिंग करत होती. सोमवारी सायंकाळी जेव्हा शिखाने तिच्या आईकडे पिझ्झा मागितला तेव्हा आईने थोड्या वेळाने पिझ्झा देते, असे सांगितले होते. यामुळे ती नाराज झाली आणि ताबडतोब तिच्या खोलीत निघून गेली होती.

Pizza हट्टामुळे 18 वर्षाच्या मुलीने संपविले जीवन...
Ludo खेळताना जडलं प्रेम, मग लग्नासाठी हजारो किमीचा प्रवास; पण गेम फिरला अन्..

काही वेळाने जेव्हा खोलीत बघितले, तेव्हा तिचा मृतदेह फासावर लटकत होता. कुटुंबीयांनी सांगितले की, १० ऑक्टोबरलाच शिखाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. घरात शिखासह तिच्या आणखी २ बहिणीसुद्धा आहेत. शिखा घरात सर्वात लहान होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, तरूणीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.