स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू
स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; ९ जणांचा मृत्यूThe Guardian

स्वीडनमध्ये भीषण विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू

विमानात ८ स्कायडायव्हर्स आणि 1 वैमानिक स्वार होते.

स्वीडन - ओरेब्रो Orebro शहरात घडलेल्या विमान Plane दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात यामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. स्वीडन पोलिसांनी Sweden Police यासंदर्भातील माहिती दिली आहे. स्वीडनच्या ज्वाइंट रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरच्या मते हे एक छोटे प्रोपेलर विमान होते, ज्याचा ओरेब्रो विमानतळाजवळ स्टॉकहोमपासून १६० किमी अंतरावर अपघात झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विमानात ८ स्कायडायव्हर्स आणि 1 वैमानिक स्वार होते. ओरेब्रो विमानतळाच्या धावपट्टी जवळ विमानाने उड्डाण भरताचं लगेचच विमानाला आग लागली. ' स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोफवेन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ओरेब्रो येथे विमान अपघात झाल्याची बातमी मला कळाली आणि मला अत्यंत दु:ख झाले आहे. माझ्या भावना सर्व पीडितांच्या कुटुंबियांसोबत असल्यचे त्यांनी ट्विटमध्ये त्यांच्या म्हटले आहे. दरम्यान, याआधी २०१९ यामध्ये अशाच प्रकारच्या एका अपघातात उत्तर स्वीडनमध्ये ९ स्कायडायव्हर्सचा मृत्यू झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com