Plane Crash in USA : अमेरिकेत विमान कोसळलं; भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून विमान अपघाताचं वृत्त हाती आलं आहे.
Plane Crash in USA
Plane Crash in USASaam tv

Plane Crash in USA : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून विमान अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. या विमान अपघातात भारतीय वंशाच्या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत पर्यटक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमान (Plane) अपघातात ६३ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. रोमा गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांची ३३ वर्षीय रीवा गुप्ता या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत . या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वृ्त्तानुसार, विमान हे आयलँडवरील घरांवरून उडत असताना पायलटला विमानातून धूर निघाल्याचे दिसते. त्यानंतर त्याने तातडीने रिपब्लिक विमानतळाला माहिती दिली. विमान हे विमानतळावर उतरत असताना त्याला आग लागली.

या विमानाच्या आगीत रोमा गुप्ता यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात मृत महिलेची मुलगी आणि पायलट देखील गंभीररित्या जखमी झाला आहे. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विमान हे मोकळ्या जागेत कोसळल्यानं मोठी नुकसान टळलं आहे. या विमान अपघातात (Accident) दोन व्यक्तींपेक्षा कोणीही जखमी झालेलं नाही. तसेच कुठल्याही मालमत्तेच नुकसान झालेलं नाही. खरंतर या विमानातील पायलटनं अशा परिस्थितीत विमानावर नियंत्रण मिळवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.

Plane Crash in USA
Train Traveling : प्रवासासाठी महिलेने पकडली ट्रेन; अचानक बाळासह घेतली उडी, पुढे काय झालं?

दरम्यान, अपघात झालेलं विमान हे चार सीटर आणि एक इंजिन असणारं होतं. विमानाने न्यूयॉर्कच्या रिपब्लिक विमानतळातून उड्डाण केलं होतं. हे विमान हे डॅनी वाइजमॅन फ्लाइट शाळेचं होतं. या शाळेच्या वकिलांनी सांगितले की, नुकतीच या विमानाची चाचणी करण्यात आली होती. प्रशिक्षणादरम्यान हा विमान अपघात झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com