Rahul Gandhi : राहुल गांधींचं टेन्शन पुन्हा वाढणार, त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं टेन्शन पुन्हा वाढणार आहे.
Rahul Gandhi News In Marathi
Rahul Gandhi News In Marathi SAAM TV

Rahul Gandhi News :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं टेन्शन पुन्हा वाढणार आहे. लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं आहे.

मोदी आडनावावरून वक्तव्य केल्यानं दाखल मानहानीच्या खटल्यात शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल यांना ७ ऑगस्टला लोकसभा सचिवालयानं पुन्हा सदस्यत्व बहाल केलं होतं. (Latest Marathi News)

Rahul Gandhi News In Marathi
Jalgaon News: तिघांचं सरकार, एक सिनियर एक ज्युनियर, दोन बायका फजिती ऐका; खडसेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

या निर्णयाच्या विरोधात लखनऊचे वकील अशोक पांडेय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. जर एखाद्या खासदार किंवा आमदाराचे सदस्यत्व कलम १०२, १९१ अंतर्गत रद्द केले जाते, तेव्हा वरिष्ठ न्यायालयाकडून आरोपातून मुक्त केलं जात नाही, तोपर्यंत पुन्हा संबंधित सदस्याला सदस्यत्व बहाल केलं जाऊ शकत नाही, असं म्हणणं त्यांनी याचिकेत मांडलं आहे.

पांडेय यांनी याचिकेत कोणता मुद्दा मांडला?

वकील पांडेय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला आहे. एखाद्या खासदार किंवा आमदाराचे सदस्यत्व एकदा रद्द झालं तर, लोकसभा अध्यक्षांना ते पुन्हा बहाल करण्याचा अधिकार नाही. लोकसभा अध्यक्षांकडून प्रसिद्ध केलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी कोर्टात केली.

Rahul Gandhi News In Marathi
Sharad Pawar on Narendra Modi: 'नरेंद्र मोदींनी फोडाफोडीचं राजकारण केलं'; शरद पवारांचा घणाघात

वरिष्ठ न्यायालयाकडून खासदाराची शिक्षा रद्द केली जात नाही, तोपर्यंत असा आदेश दिला जाऊ शकत नाही. तसेच त्यांना पुन्हा काम करण्याची परवानगी अध्यक्षांकडून दिली जाऊ शकत नाही, असंही म्हणणं पांडेय यांनी याचिकेत मांडलं आहे.

निवडणूक आयोगानेही लोकसभा सदस्याची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना काढायला हवी होती. सीआरपीसीच्या सेक्शन ३८९ अंतर्गत वरिष्ठ न्यायालयालाच दोषी ठरवण्याच्या निर्णयाविरोधात सुनावणी घेऊन सुनावलेली शिक्षा स्थगित किंवा रद्द करण्याचा अधिकार आहे, असंही याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com