
PM Narendra Modi G7 summit 2023: सध्या जपानमध्ये G-7 परिषद सुरु आहे. या परिषदेमध्ये अनेक देशांचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली आहे. अशात मोदी यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांची लोकप्रियता तब्बल ७८ टक्के असल्याचं समोर आलं आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनाही मागे टाकलं आहे. (Latest Pm Modi News)
अधिक माहिती अशी की, नुकतेच २२ देशांचे एक सर्वेक्षण पार पडले. यात फक्त ४ देशांच्या नेत्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रियता असल्याचे समजले आहे. जी-7 परिषदेत लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
समोर आलेल्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट, आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा समावेश आहे.
या देशातील नेत्यांची लोकप्रियता सर्वात कमी
अमेरिका, (America ) जपान, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना कमी असल्याचे सर्वेक्षणात दिसले आहे. या देशांमध्ये जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रप्रमुखांची लोकप्रियता कमी असल्याचा दावा सर्वेक्षणातून करण्यात आलाय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.