Wardha Accident: पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी PMNRF मधून प्रत्येकी 2 लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
PM Modi
PM ModiSaam Tv

नवी दिल्ली - तूळजापूर मार्गावर देवळी नजीकच्या सेलसुरा येथे मोठा अपघात झाला आहे. झायलो कार यवतमाळ (Yavatmal) येथून नागपूरकडे (Nagpur) जात असताना पुलाच्या खाली कोसळली आहे. यात भीषण अपघातात (Accident) सात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भाजप (BJP) आमदाराच्या मुलाचा देखील समावेश आहे. या भीषण अपघाताची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) घेतली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी PMNRF मधून प्रत्येकी 2 लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सेलसुराजवळ झालेल्या भीषण अपघातामधील जीवितहानीमुळे मला दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासठी मी प्रार्थना करतो, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

रात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रात्रीच्या वेळीला जंगली श्वापदं वाहनासमोर आल्याने वाहन अनियंत्रित झालं आणि थेट ४० फुट खोल दरी ही कार कोसळली. सेलसुरा येथील जुना आणि नवीन पुलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुस्कान झाले आहे. गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघाताची माहिती समजताच सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या अपघातात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांचा देखील मृत्यू झाला आहे.

इतर ६ मृतांची नावे -

निरज चौहान (वय 22, रा. गोरखपुर, उ. प्रदेश),

अविष्कार विजय रहागडाले (वय 21 रा. गोंदिया),

नितेशसिंग (वय 25, रा. ओडिशा)

विवेक नंदन (वय 23 रा. गया, बिहार)

प्रत्युशसिंह हरेन्द्रसिंह (वय 23 रा. गोरखपुर, उ.प्रदेश),

शुभम जयस्वाल (वय 23 रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उ,.प्रदेश),

पवनशक्ती (वय 19, रा.गया बिहार) यांचा समावेश आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com