PM Modi : दहशतवाद, ड्रग्ज, भ्रष्टाचारापासून मोठा धोका; PM मोदींनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं

दहशतवाद, ड्रग्ज आणि भ्रष्टाचार हे जगासाठी प्रचंड धोकादायक आहेत असं मी जगाला सांगू इच्छितो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Narendra Modi-Interpol General Assembly/Social Media
PM Narendra Modi-Interpol General Assembly/Social MediaSAAM TV

PM Narendra Modi In Interpol General Assembly : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद, भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थ तस्करी या मुद्द्यांवर प्रचंड आक्रमक झालेले दिसून आले. दहशतवाद, ड्रग्ज आणि भ्रष्टाचार हे जगासाठी प्रचंड धोकादायक आहेत असं मी जगाला सांगू इच्छितो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजित केलेल्या ९०व्या इंटरपोल महासभेत ते बोलत होते. (PM Narendra Modi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीच्या (New Delhi) प्रगती मैदानात आयोजित ९०व्या इंटरपोल महासभेचा शुभारंभ झाला. या महासभेत १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रतिनिधी मंडळांत सदस्य देशांचे मंत्री, पोलीस प्रमुख, केंद्रीय ब्युरोचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले आहेत. (Latest Marathi News)

PM Narendra Modi-Interpol General Assembly/Social Media
मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाची चौकशी होणार, सुप्रीम कोर्टाचे 9 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे RBI आणि केंद्राला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरपोल महासभेला संबोधित केलं. ''मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, दहशतवाद, अंमली पदार्थ आणि भ्रष्टाचारापासून संपूर्ण जगाला धोका आहे. यासाठी सर्वांना एकत्रित येऊन त्याविरोधात लढा द्यावा लागेल. संपूर्ण जगासाठी सायबर क्राइम आणि ऑनलाइन रेडिकॅलायजेशन यांचा मोठा धोका आहे. फायनान्स क्राइम आणि भ्रष्टाचाराचाही मोठा धोका आहे,'' असे मोदी म्हणाले.

PM Narendra Modi-Interpol General Assembly/Social Media
आत्मघाती हल्लेखोराला रशियात अटक, सत्ताधारी भाजपचा बडा नेता होता टार्गेटवर

उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. राजधानी दिल्लीत स्वीडनपेक्षा जास्त लोक राहतात. कुंभमेळ्यातच कोट्यवधी भाविक येतात. हिंदुस्थान केवळ आपल्या नागरिकांचेच संरक्षण करत नाही तर, आपल्या देशाच्या लोकशाहीचंही संरक्षण आणि ती अधिक मजबूत करत आहे. आमच्या देशाची लोकशाही आणि विविधता ही संपर्ण विश्वासाठी एक आदर्श उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

पोलिसांना कनेक्ट करण्याचा उद्देश

९०व्या इंटरपोल महासभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी त्याचा उद्देश स्पष्ट केला. भारत देश स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशातील नागरिक, संस्कृती आणि आतापर्यंत मिळवलेलं यश याचा हा उत्सव आहे. आम्ही कुठे होतो आणि कुठे पोहोचलो, पुढे आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे बघण्याची ही वेळ आहे. पोलिसांना आपांपसात कनेक्ट करणे हा इंटरपोलचा उद्देश आहे, असंही मोदी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com