PM Modi : ...तर परिणाम भोगावे लागतील!; PM मोदींचा पाकिस्तान, चीनला कडक इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NMFT परिषदेत चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता खडेबोल सुनावले आहेत.
PM Modi In NMFT Conference/ANI
PM Modi In NMFT Conference/ANISAAM TV

PM Modi In NMFT Conference: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नो मनी फॉर टेरर' या विषयावर आयोजित केलेल्या NMFT परिषदेत चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांना खडेबोल सुनावले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला. काही देश आपल्या परराष्ट्र धोरणांतर्गत दहशतवादाला समर्थन देतात, तर काही देश दहशतवाद्यांविरोधातील कारवाया रोखण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न करतात, असं मोदी म्हणाले. दहशतवादाला पाठिंबा दिला तर, त्याचे वाइट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशाराही त्यांनी या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून दिला.

दहशतवादासाठी अर्थपुरवठा करण्याच्या मुद्द्यासंदर्भात 'नो मनी फॉर टेरर' या विषयावर आयोजित तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेत ७० पेक्षा अधिक देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेला पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) संबोधित केले. दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

PM Modi In NMFT Conference/ANI
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डीझेल लवकरच स्वस्त होणार, मोदी सरकारचा काय आहे नवा प्लान?

दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणारे स्त्रोत खूप आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. एखाद्या देशाकडून मदत पुरवणे हा त्यातील एक स्त्रोत आहे. काही देश आपल्या परराष्ट्र धोरणांतर्गत दहशतवादाला (Terrorist) प्रोत्साहन देतात, पाठिंबा देतात. ते त्यांना राजकीय, वैचारिक आणि आर्थिक मदत पुरवतात, याकडेही पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधलं. युद्ध होत नाही याचा अर्थ शांतता आहे असा विचार आंतरराष्ट्रीय संघटनांनी करू नये. छुपे युद्ध देखील धोकादायक आणि हिंसक असतं, असंही मोदी म्हणाले.

PM Modi In NMFT Conference/ANI
PM Modi : दहशतवाद, ड्रग्ज, भ्रष्टाचारापासून मोठा धोका; PM मोदींनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं

दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यावं

पाकिस्तान हा भारतात विशेषकरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी अतिरेकी संघटनांना सर्व प्रकारची मदत करतो हे बऱ्याचदा भारत सरकारनं ठासून सांगितलं आहे. दहशतवादाला कोणत्याही प्रकारे दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याला आणि पाठिंबा देणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी जगानं एकवटायला हवं. त्याची आवश्यकता आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

दहशतवादाचा संबंध कोणत्या धर्माशी जोडू नये - शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या परिषदेत संबोधन करताना आपलं मत मांडलं. दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणे हा दहशतवादापेक्षा मोठा धोका आहे. या दहशतवादाचा संबंध कुणा एका धर्माशी किंवा समुदायाशी जोडला जाऊ नये, असे अमित शहा म्हणाले. दहशतवादाला संरक्षण देणं म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. त्यामुळे अशा देशांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ नये ही जबाबदारी सर्व देशांची आहे, असंही आवाहन शहा यांनी यावेळी केलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com