
विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका होताना दिसत आहे. जी २० परिषदेत इंडिया नाव बदलून भारत लिहिल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यासह सनातन धर्मवरुन वाद देखील सुरू आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सनातन वादावरून विरोधकांच्या टीकेवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मध्य प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी बिना येथे ५०, ७०० कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांच्या पायाभरणीच्या कार्यक्रमांना मोदी उपस्थित होते. "विरोधकांनी ज्या इंडिया आघाडीची स्थापना केली आहे तिला काही लोक अहंकारी युती म्हणत आहेत. अहंकारी युतीने मुंबईतील आपल्या बैठकीत धोरणे ठरवली आहेत. भारताच्या संस्कृतीवर, सनातन परंपरेवर आणि भारतीयांच्या श्रद्धेवर आघात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.", अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, " इंडिया आघाडीमधील नेत्यांना सनातन धर्माचा नाश करायचा आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन त्यांना रोखावे लागले. संघटना आणि एकीचे बळ दाखवत विरोधकांचे डाव उधळून लावायचे आहेत. "
पंतप्रधान मोदींनी मध्यप्रदेशमध्ये ५०,७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण केले. या प्रकल्पांत १० मोठ मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. काही वेळातच मोदी छत्तीसगडला रवाना होणार आहेत. येथे ६ हजार ३५० कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.