Narendra Modi News : काहींनी मोदींच्या बदनामीची सुपारीच घेतलीय; खुद्द पंतप्रधानांनीच सांगितला 'डाव'

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. ते भोपाळमध्ये बोलत होते.
PM Narendra Modi News
PM Narendra Modi NewsSaam Tv

PM Narendra Modi News : 'काही लोकांनी मोदींचे नाव आणि प्रतिमा खराब करण्याची सुपारी दिली आहे, जणू त्यांनी शपथच घेतली आहे, की ते हे काम करुनच दाखवतील. असे लोक देशात तर आहेच पण देशाबाहेर सुद्धा आहे', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. ते भोपाळमध्ये बोलत होते.  (Latest Marathi News)

PM Narendra Modi News
Shraddha Walkar Case : श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालाला जेलमध्ये मारहाण; कैदी एकत्र जमले अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेश (Madhya Pradesh) दौऱ्यावर आहेत. आज भोपाळमध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. ही वंदे भारत ट्रेन भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावणार आहे. भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

इंदूरमधील दुर्घटनेबद्दल व्यक्त केले दु:ख

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंदूरमधील दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये घडलेली घटना अत्यंत दु:खद आहे, असं म्हणत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती त्यांनी शोक व्यक्त केला. त्याचबरोबर दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

काँग्रेस नेत्यांवर साधला निशाणा

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला.'काही लोकांनी मोदींचे नाव आणि प्रतिमा खराब करण्याची सुपारी दिली आहे, जणू त्यांनी शपथच घेतली आहे, की ते हे काम करुनच दाखवतील. असे लोक देशात तर आहेच पण देशाबाहेर सुद्धा आहे', अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांवर केली.

PM Narendra Modi News
काय सांगता! ChatGPT वापरून पठ्ठ्याने ३ महिन्यातच कमावले २८ लाख; जाणून घ्या कसे?

१ एप्रिलला हा कार्यक्रम होत असताना मोदी म्हणाले, आता काँग्रेसचे नेते म्हणतील की १ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल फूल बनवतील. मात्र, ही ट्रेन सुरू केल्याने मध्य प्रदेशात राहणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. व्यावसायिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत दिल्लीत प्रवेश करणे आणखी सोपे होईल.

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी काही विद्यार्थीशी देखील संवाद साधला. मोदी म्हणाले, की पूर्वी रेल्वेत स्वच्छतेची काळजी घेतली जात नव्हती, लोक इतके कंटाळले होते की त्यांनी तक्रार करणे बंद केले. पण आता तसे राहिले नाही. या प्रणालीचा सर्वाधिक लाभ महिलांना मिळाला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com