Narendra Modi: मोदी हे देवाचा अवतार, हवं तोपर्यंत पंतप्रधानपदी राहतील; भाजप मंत्र्याचे वक्तव्य

'PM मोदी देवाचाच अवतार असल्याने त्यांची इच्छा आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधानपदी राहू शकतात.'
Pm Modi
Pm ModiSaam Tv

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देवाचा अवतार असून ते हवं तेव्हा लोकांकडून त्यांना जे हवं ते ते करवून घेतात. ते देवाचाच अवतार असल्याने त्यांची इच्छा आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधानपदी राहू शकतात असं वक्तव्य उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्री गुलाब देवी (Gulab Devi) यांनी केलं आहे.

गुलाब देवी या सांभल जिल्ह्यातील चांदौसी या मतदारसंघातील भाजपच्या आमदार आहेत. त्यांनी एका ठिकाणी बोलताना मोदींचं तोंडभरून कौतुक करत त्यांना देवाचा अवतार बनवलं असून त्यांचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेचा विषय बनलं आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, यावेळी देवी यांना देशात अल्पसंख्याक व्यक्तीला पंतप्रधान करण्याबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, ही लोकशाही आहे, इथे कोणी काहीही वक्तव्य करू शकतो, त्यासाठी कोणाचेही बंधन नाहीये शिवाय आम्ही या वक्तव्यांना फारसे महत्त्व देत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अवताराच्या रूपात असून ते विलक्षण प्रतिभा असलेले व्यक्ती आहेत, त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. शिवाय जोपर्यंत मोदींची इच्छा आहे जोपर्यंत त्यांचे आयुष्य आहे तोपर्यंत ते पंतप्रधान राहतील असं देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Pm Modi
Maharashtra Politics : 'बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते, लवकरच ते मंत्रीपदी दिसतील'

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, या चर्चांमुळे मोदी पंतप्रधानपदावरून हटणार नाहीत किंवा त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती येणार नाही. ते देवाचे अवतार आहेत, देवाने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून येथे पाठवले आहे. हवं तेव्हा ते लोकांकडून त्यांना जे हवं ते ते करवून घेतात, असंही गुलाब देवी म्हणाल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com