PM Narendra Modi Speech: जुन्या संसद भवनातून PM मोदींचं भाषण; भावुक होत म्हणाले, 'या भवनामध्ये...'

PM Narendra Modi Latest Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवानातून जोरदार भाषण केलं.
PM Narendra Modi Latest Speech
PM Narendra Modi Latest SpeechSaam TV

PM Narendra Modi Latest Speech: देशाच्या ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसद इमारतीत आज कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. थोड्याच वेळात नव्या इमारतीत थोड्याच कामकाज मंत्री तसेच खासदार प्रवेश करणार आहे. मात्र, या प्रवेशाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनातून जोरदार भाषण केलं. यावेळी मोदी भावुक देखील झाले. या संसद भवनात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत. असं म्हणत मोदींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Latest Marathi News)

PM Narendra Modi Latest Speech
Husband Wife Relations: शरीरसंबंधाला जाणीवपूर्वक नकार देणं ही क्रूरता; घटस्फोट प्रकरणात हायकोर्टाचं मत

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, आज संसद भवनाचे हे मध्यवर्ती सभागृह अनेक भावनांनी भरलेले आहे. निरोप घेताना संसद भवन आपल्याला अधिक भावनिक बनवत आहेत. त्याचबरोबर पुढे जाण्याची प्रेरणा देखील देत आहे. या संसद भवनात आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय झाल्याचं मोंदींनी म्हटलं.

"या संसद भवनात तिहेरी तलाकचा कायदा झाला. ट्रान्सजेंडर्सना न्याय देण्याचे कामही येथे झाले.आमचे भाग्य आहे की याच सभागृहात कलम ३७० हटवून दहशतवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलण्यात आले. आज जम्मू-काश्मीर शांतता आणि विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी कटिबद्ध आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत झाली: PM मोदी

पूर्वीपेक्षा आता भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि बळकट झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. जगाला खात्री आहे की भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत टॉप 3 मध्ये पोहोचणार आहे. भारताचे बँकिंग क्षेत्र मजबूत झाले आहे. आज आपण जिथे आहोत तिथे एकत्र येऊन पोहोचलो आहोत आता थांबायचं नाही, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्याकडे ७५ वर्षांचा अनुभव आहे. या संसदेतून आम्ही खूप काही शिकलो आहे. तसेच आपल्याकडे मोठा वारसा देखील आहे. अमृतकालच्या २५ वर्षांत भारताला आता एका मोठ्या कॅनव्हासवर काम करावे लागणार आहे. आता छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडण्याची वेळ निघून गेली आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, पक्षांनी याच्या आड येऊ नये, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

PM Narendra Modi Latest Speech
Bihar Police Viral Video : खाकी वर्दीतले दोन पोलीस रस्त्यातच भिडले, VIDEO व्हायरल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com