PM मोदींनी ८ वर्षीय मुलीला विचारलं, मी काय करतो? चिमुकलीच्या उत्तरानं मोदींसह सर्वच हसून लोटपोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बुधवारी संसद भवनात एका आठ वर्षीय मुलीची भेट घेतली. मी कोण आहे, ओळखतेस का? असं मोदी यांनी या चिमुकलीला विचारलं.
PM मोदींनी ८ वर्षीय मुलीला विचारलं, मी काय करतो? चिमुकलीच्या उत्तरानं मोदींसह सर्वच हसून लोटपोट

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बुधवारी संसद भवनात एका आठ वर्षीय मुलीची भेट घेतली. मी कोण आहे, ओळखतेस का? असं मोदी यांनी या चिमुकलीला विचारलं. त्यावर 'तुम्ही मोदीजी आहात', असं उत्तर या चिमुकलीनं दिलं.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनमधील भाजपचे खासदार अनिल फिरोजिया हे बुधवारी आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्यासाठी संसद भवनात पोहोचले. त्यावेळी त्यांची मुलगी अहाना हिनंही मोदींशी गप्पा मारल्या. (Narendra Modi News In Marathi )

PM मोदींनी ८ वर्षीय मुलीला विचारलं, मी काय करतो? चिमुकलीच्या उत्तरानं मोदींसह सर्वच हसून लोटपोट
मोदी सरकारचा मोठा निर्णय! बीएसएनएलसाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप (BJP) खासदार अनिल फिरोजिया यांची मुलगी अहाना हिला मला ओळखतेस का, मी कोण आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर तुम्ही मोदीजी आहात, मी तुम्हाला ओळखते. तुम्हाला मी टीव्हीवर बघते आणि तुम्ही लोकसभा टीव्हीत नोकरी करता, असं उत्तर या मुलीनं निरागसपणे दिलं. मोदी आणि या चिमुकलीचा संवाद ऐकून तिथं उपस्थित असलेल्या सर्व जण हसून लोटपोट झाले. इतकंच नाही तर स्वतः मोदीही हसू लागले. त्यानंतर मोदींनी मुलीला रिकाम्या हाती जाऊ दिलं नाही. तिला त्यांनी चॉकलेट दिलं.

भाजप खासदारानं ट्विट करून दिली माहिती

भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी, मोदी यांच्या भेटीबाबत ट्विट करून माहिती दिली. आजचा दिवस अविस्मरणीय आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांची आज सहकुटुंब भेट घेण्याचे भाग्य लाभले. त्यांचे आशीर्वाद आणि जनतेची निस्वार्थ सेवा करण्याचा मंत्र मिळाला, असं फिरोजिया यांनी ट्विट करून सांगितलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com