PM Modi News : भारतात येताच PM मोदींनी विरोधकांवर केला जोरदार प्रहार; ऑस्ट्रेलियातील राजकीय किस्सा सांगितला

PM Narendra Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर असतानाच देशात नव्या संसद भवनच्या उद्घाटनावरून राजकारण तापलं आहे.
PM modi latest News
PM modi latest NewsSaam TV

PM Narendra Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर असतानाच देशात नव्या संसद भवनच्या उद्घाटनावरून राजकारण तापलं आहे. मोदी आज सकाळी भारतात परतले आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्या सर्व विरोधकांवर त्यांनी जोरदार प्रहार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते २८ मे रोजी नवीन संसद भवनच्या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. त्यावर आता पंतप्रधानांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

PM modi latest News
Arvind Kejriwal News : Delhi सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले, केजरीवालांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

लोकशाहीची ताकद काय असते, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. भारतीय समूहाचा जो कार्यक्रम सीडनीमध्ये झाला, तेथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान येणे ही गौरवास्पद बाब होती. इतकेच नाही तर त्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधानही होते. त्या ठिकाणी सर्व विरोधी पक्षांचे नेते होते.

सत्ताधारी पक्षाचेही नेते होते. ऑस्ट्रेलियातील सत्ताधारी असो किंवा विरोधक, तितक्यात उत्साहाने ते भारतीयांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण व्हिडिओ बघा!

PM modi latest News
Modi Govt 9th Anniversary: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, भाजप राबवणार 'हा' मास्टर प्लॅन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच, नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्या काँग्रेससह १९ विरोधी पक्षांना सल्ला दिल्याचे मानले जाते.

२० राजकीय पक्षांचा बहिष्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनचे उद्घाटन होणार असून, या सोहळ्यावर २० पक्षांनी बहिष्कार घातला आहे. तर १७ राजकीय पक्षांचे नेते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या नवीन संसद भवनचे उद्घाटन पंतप्रधान नव्हे तर, राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, असे काँग्रेससह विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com