5G नंतर आता 6G ची तयारी, PM मोदीचे संकेत

5G सेवेनंतर आता देशात 6G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू
PM Modi on 6G
PM Modi on 6G Saam Tv

दिल्ली: 5G सेवेनंतर आता देशात 6G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले आहे की, या दशकाच्या अखेरीस देशात 6G सेवा सक्षम करण्यासाठी सरकारकडून (government) प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या देशात 3G आणि 4G (3G & 4G) सेवा उपलब्ध आहे. पुढील काही महिन्यांत 5G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला संबोधित करत असताना, PM मोदी म्हणाले की येत्या १५ वर्षांत 5G देशाच्या अर्थव्यवस्थेत $४५० अब्ज योगदान देणार आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. २१व्या शतकात कनेक्टिव्हिटी देशाच्या प्रगतीचा वेग ठरवणार, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

हे देखील पाहा-

पंतप्रधान (Prime Minister) मोदींनी या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील जारी केले आणि IIT मद्रासच्या नेतृत्वाखालील एकूण ८ संस्थांनी बहु-संस्था सहयोगी प्रकल्प म्हणून विकसित केलेल्या 5G चाचणी बेडचे देखील लोकार्पण केले आहे. या प्रकल्पाशी संबंधित संशोधक आणि संस्थांचे अभिनंदन करत असताना ते म्हणाले की, मला माझा स्वतःचा, स्वत: निर्मित 5G चाचणी देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रात गंभीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल राहणार आहे.

PM Modi on 6G
बैलाने मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, केज तालुक्यातील घटना !

पुढे ते म्हणाले की, २१ व्या शतकात कनेक्टिव्हिटी भारत देशाच्या प्रगतीचा वेग ठरवणार आहे. यामुळे प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीचे आधुनिकीकरण करावे लागणार आहे. पंतप्रधान म्हणाले की 5G तंत्रज्ञानामुळे अनेक बदल होणार आहेत. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. ते म्हणाले, या दशकाच्या अखेरीस 6G सेवा शक्य करण्यासाठी एका टीमने काम सुरू केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com