आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात'; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करतात.
आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात'; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष
आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात'; काय बोलणार याकडे देशाचं लक्षSaam Tv

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (रविवारी) सकाळी 11 वाजता त्यांच्या 83 व्या 'मन की बात' भागात देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करून याबाबाद माहिती दिली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे. मोदींचा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन समूह नेटवर्क किंवा आकाशवाणीच्या वेबसाईट सोबतच अॅपवरही प्रसारित होणार आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करतात.

हे देखील पहा -

आजच्या या मोदी मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायद्यांबाबत बोलू शकतात. तसेच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराबद्दलही बोलू शकतात, असे मानले जात आहे. मन की बातच्या शेवटच्या एपिसोडमध्ये पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर भर दिला होता.

आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात'; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष
आईचा सांभाळ करीत नसलेल्या प्राध्यापकाला सत्र न्यायालयाची तंबी

मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मासिक रेडिओच्या माद्यमातून देशाला संबोधन करतात, जे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केले जाते. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन आणि आकाशवाणी आणि मोबाईल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर देखील प्रसारित केला जातो.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com