Rahul Gandhi यांच्या निवासस्थानी पोहोचले पोलीस, काश्मीरमध्ये महिलांबाबत केलेल्या वक्तव्याची चौकशी करणार

Rahul Gandhi Statement: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये केलेल्या वक्तव्यावर दिल्ली पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत.
Rahul Gandhi Statement
Rahul Gandhi Statementsaam tv

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकारी पोहोचले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये केलेल्या वक्तव्यावर दिल्ली पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. याआधी 16 मार्च रोजी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस दिली होती. मात्र त्यांनी या नोटिसीला प्रतिसाद दिला नाही.

यानंतर दिल्ली पोलीस आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राहुल गांधी काश्मीरमध्ये बोलताना 'अनेक महिलांनी माझ्याकडे लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहेत. आजही महिलांसोबत लैंगिक छळ होत आहे', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर त्या महिलांची माहिती जाणून घेऊन कायदेशीर कारवाई करता करता येईल यासाठी दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले आहे.

Rahul Gandhi Statement
Chhatrapati Sambhajinagar मध्ये नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांचा मोर्चा! हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

विशेष सीपी स्तरावरील अधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकारी आज राहुल गांधींशी बोलण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून पीडित महिलांची माहिती मिळू शकेल. दिल्ली पोलीस पोहोचून जवळपास दोन तास झाले असले तरी पोलिसांनी अद्याप राहुल गांधी यांची भेट घेतलेली नाही. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एएनआयला सांगितले की "भारत जोडो यात्रा संपून ४५ दिवस झाले आहेत. दिल्ली पोलीस ४५ दिवसांनी चौकशीसाठी जात आहेत. जर त्यांना इतकी चिंता असेल तर ते फेब्रुवारीतच का गेले नाहीत? राहुल गांधींची कायदेशीर टीम कायद्यानुसार उत्तर देईल." दरम्यान जयराम रमेश यांच्यासह राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हेही राहुल गांधींच्या घरी पोहोचले आहेत.

Rahul Gandhi Statement
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

एजन्सीचा गैरवापर होत असल्याचा आपचा आरोप

दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी चौकशीसाठी पोहोचल्यानंतर आपचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार आपल्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. राहुल गांधींसोबतही एजन्सीचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. एजन्सीचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचे आहे. ते होऊ नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com