धावत्या कारमध्ये उभं राहून सेल्फी घेणं नवरदेवाच्या अंगलट, पोलिसांनी ठोठावला २ लाखांचा दंड

धावत्या कारमधून जात असताना एका लग्नाच्या वऱ्हाडात नवरदेवासह वऱ्हाड देखील हा जीवघेणा स्टंट करत असल्याचं या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण राष्ट्रीय महामार्ग ५८ वर कारमधून जात असताना सेल्फी घेताना दिसत आहेत. मात्र, हे सेल्फी ते धावत्या कारच्या खिडक्या आणि सनरूफमधून बाहेर पडून घेत असल्याचं व्हिडीओमध्ये (Video) दिसतं आहेत.

हे कमी की काय म्हणून याच गाड्यांच्या ताफ्यातील एका मोकळ्या गाडीत उभे राहून एक नवरदेव सेल्फी घेताना दिसत आहे. या नवरदेवाच्या पेहरावामुळे हा गाड्यांचा ताफा लग्नाच्या वऱ्हाडाचा असल्याचं दिसतं असून नवरदेवासह वऱ्हाड देखील हा जीवघेणा स्टंट करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

ही घटना मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील दिल्ली डेहराडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८ वरील असून हे क्षेत्र छपर पोलीस स्टेशन अंतर्गत येते. १२ जून रोजी अंकित कुमार नावाच्या तरुणाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोट केला होता.

हे देखील पाहा -

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे मुझफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत या व्हिडीओमधील ९ वाहनांचे नंबर ट्रेस केले आणि स्टंट करणाऱ्यांना जवळपास २ लाख २ हजार रुपयांचा दंड ठोठावला. वाहतुक पोलिसांनी हा दंड केला आहेच, शिवाय या प्रकरणी मुजफ्फरनगर पोलीसांनी स्टंट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना ट्रॅफिक एसपी कुलदीप सिंह यांनी सांगितलं की, 'सोमवारी एका नागरिकाने एसएसपी साहब यांच्या ट्विटर (Tweet) हँडलवर ट्विटरवर हा व्हिडीओ पाठवला त्यामध्ये काही तरुण वाहनांचे सनरूफ उघडे ठेवून बाहेर उभे होते किंवा खिडक्यांमधून बाहेर पडत सेल्फी घेतल्याचं दिसले त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com