Shradha Walker Case : आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होणार; कशी केली जाते ही चाचणी?

न्यायालयाने पॉलिग्राफ टेस्ट करण्यास परवानगी दिली, तर येत्या काही दिवसात आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होईल.
Shraddha Walker case
Shraddha Walker casesaam tv

शिवाजी काळे

Shradha Walker Case : पोलिसांना श्रद्धा हत्या प्रकरण लवकरात लवकर सोडवायचे आहे. मात्र, सध्या तरी त्यांच्या हाती ठोस पुरावे लागलेले नाहीत. मारेकरी आफताब पोलिसांच्या ताब्यात असला तरी श्रद्धाशी संबंधित कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळं पोलिसांनी आज न्यायालयाकडे पॉलिग्राफ टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे. (Latest Marathi News)

Shraddha Walker case
Shraddha Walker : श्रद्धा प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट; आफताबचं नवीन CCTV फुटेज समोर, पाहा VIDEO

न्यायालयाने या अगोदरच पोलिसांना (Police) आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. जर आज न्यायालयाने पॉलिग्राफ टेस्ट करण्यास परवानगी दिली, तर येत्या काही दिवसात आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होईल.

काय आहे पॉलिग्राफ टेस्ट?

आफताबने हत्या करून मृतदेहाचे तुकडे कोठे फेकले, याचा तपास सुरू आहे. आफताब पोलिसांपासून कोणत्या गोष्टी लपवत आहे आणि इतर सत्य जाणून घेण्यासाठी पोलिस त्याची नार्को टेस्ट करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची आता पॉलिग्राफ टेस्ट होण्याची शक्यता आहे.

पॉलीग्राफ चाचणीला लायडिटेक्टर टेस्ट असेही म्हणतात. खोटे पकडण्यासाठी एक खास तंत्र आहे. यामध्ये आरोपी किंवा संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाते आणि तो उत्तर देतो तेव्हा एका खास मशीनच्या स्क्रीनवर अनेक ग्राफ तयार होतात.

नाडी, हृदय गती आणि रक्तदाब यातील बदलानुसार आलेख वर खाली सरकतो. व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे त्याच्या आलेखावरून समजते. ग्राफमध्ये असामान्य बदल दिसत असल्यास, याचा अर्थ ती व्यक्ती खोटे बोलत आहे.

Shraddha Walker case
Shraddha Walker-Aftab Case: श्रद्धा वालकर प्रकरणी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, तपास सीबीआयकडे सोपवणार?

आफताब विकायचा ड्रग्ज; श्रद्धाच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

श्रद्धा हत्याकांडामुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे. आता या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धा व आफताबच्या नात्याविषयी गॉडविन रोड्रिग्ज नामक व्यक्तीने अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या व्यक्तीनेच आफताब श्रद्धाला मारहाण करत असल्याचा दावा केला होता.

गॉडविनने केलेल्या दाव्यानुसार श्रद्धाने त्याला सांगितले होते की आफताब ड्रग्ज विकत होता. हे ड्रग्ज विकत घेण्यासाठी त्याच्याकडे रात्री-बेरात्रीही ग्राहक येत होते. एवढेच नाही तर आफताबच्या गैरहजेरीत श्रद्धा स्वतः ड्रग्ज विकत होती. श्रद्धाने याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे गॉडविन्सन सांगितल्याचा दावा त्याने माध्यमांशी बोलताना केला आहे. त्याच गॉडविनने माध्यमांशी बोलताना आपण २०२० मध्ये श्रद्धाची मदत केल्याचे म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com