Viral Video: ती असाहय्य तरुणी सुटकेसाठी गयावया करत होती अन् तो भररस्त्यात... पोलिस कर्मचाऱ्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी भडकले

Police Man Viral Video: पोलिस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे....
Viral Video
Viral VideoSaamtv

Bhopal Viral Video: देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा नेहमीप्रमाणेच ऐरणीवर आला आहे. एकीकडे मुलींच्या सुरक्षितेबाबत पोलिसांकडून विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबवले जात असताना सध्या समोर आलेल्या एका व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक पोलिस अधिकारीच भररस्त्यात मुलीची छेड काढत अश्लिल कृत्य करताना दिसत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील (Viral Video) नेमके सत्य, चला जाणून घेवू...

Viral Video
Bus Accident : लक्झरी बस थेट ट्रेनला जाऊन धडकली; सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर अनेकदा असे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे अनेकांचा खरा चेहरा समोर येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्या संगीता शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी चक्क रात्री एका तरुणीचा विनयभंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत रक्षकच भक्षक बनल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तसेच या व्हिडिओमधील पोलिस कर्मचाऱ्याला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

Viral Video
ED Raids : दिल्लीपासून बिहारपर्यंत...लालू यादवांशी संबंधित १५ ठिकाणांवर ED चे छापे, तेजस्वीसह नातेवाइकही रडारवर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवर बसलेला एक पोलिस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे. तो पोलीस महिलेला पकडून तिला अयोग्यरित्या स्पर्श करताना दिसत आहे. या लाजिरवाण्या घटनेचा व्हिडिओ मध्य प्रदेशातील हौनमानगंज पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचे समोर आले आहे.

व्हिडिओमधील मुलगी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. खूप प्रयत्नांनंतर ती स्वत:ला त्या हैवानाच्या तावडीतून सोडवण्यास यशस्वी होते. परंतु गणवेशातील माणूस दुचाकीवर तिच्या मागे येतो. अशात घाबरलेली मुलगी रस्त्याच्या पलीकडे पळते.

कॉंग्रेस (Congress) नेत्या संगीता शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून भाजप सरकारच्या राज्यात हे काय चालले आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच नेटकऱ्यांनीही या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशा पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते, अशा शब्दात नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com