
Rahul Gandhi News : काँग्रेस नेत, खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भारतीय लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने हल्लाबोल सुरु केला आहे. भाजपचे मंत्री आणि नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत. मात्र या सगळ्यात राहुल गांधी यांची खासदारकीही जाऊ शकते.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींविरुद्ध देशद्रोहासह इतर संभाव्य कारवाईचा अंदाज वर्तवला जात आहे. लोकशाही आणि स्वायत्त संस्थांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांबाबत राहुल गांधींविरोधात समिती गठित करण्याची मागणीही दुबे यांनी केली आहे. (Political News)
दुबे यांनी विशेषाधिकार समितीसमोर असा युक्तिवाद केला की, राहुल यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर केलेल्या विधानादरम्यान तीन विशेषाधिकारांचे उल्लंघन केले. राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना न कळवता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निराधार, बदनामीकारक आणि असंसदीय दावे करून नियम 352 चे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकीच आता धोक्यात येते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. (Latest News)
नियम काय सांगतो?
संसदीय नियमांच्या नियम 352 (2) नुसार, लोकसभेच्या अध्यक्षांना पूर्वसूचना देऊन आणि त्यांच्या परवानगीनेच खासदाराला सभागृहातील अन्य सदस्याबद्दल एखादं वक्तव्य करता येते. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करून हा नियम मोडला आहे, असा युक्तिवाद निशिकांत दुबे यांनी केला आहे.
दुबे यांनी विशेषाधिकार समितीसमोर 1976 ची घटना मांडली, ज्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांची राज्यसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. कारण त्यांनी अध्यक्षांना पूर्वसूचना आणि परवानगी न घेता पंतप्रधानांवर आरोप केले होते. निशिकांत दुबे यांनी विशेषाधिकार समितीसमोर दिलेला तिसरा युक्तिवाद म्हणजे राहुल गांधींचे भाषण लोकसभा अध्यक्षांनी संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून काढून टाकले. मात्र ट्विटर आणि यूट्यूबवर राहुल गांधींच्या हँडलमध्ये संसदेच्या कामकाजातून काढून टाकलेल्या त्यांच्या कमेंट्स अजूनही आहेत. भाजप खासदाराच्या मते, राहुल गांधींचे हे कृत्य सभागृहाच्या अध्यक्षांच्या अधिकाराचे उल्लंघन करते.
ब्रिटनमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी 'भारतीय लोकशाहीवर क्रूर हल्ला' असं वक्तव्य केलं होतं. यावरुन भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांना घेरलं आ्हे. राहुल गांधी यांनी परदेशातून जाऊन देशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या मुद्द्यावरुन संसदेतही मोठा गदारोळ झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या चार दिवसांत राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.