
Morocco Earthquake Video: आफ्रिकन देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरक्कोमधून एक भयानक घटना समोर आली आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात शेकडो घरे कोसळली असून आतापर्यंत २९६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५३ लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. (Latest Marathi News)
सध्या बचावकार्य जोमाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यूएस स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या १२० वर्षातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप (Earthquake) आहे. या भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोक धावताना दिसत आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराकेश शहरापासून ७१ किमी दक्षिण-पश्चिमेस १८.५ किमी खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजेच्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान शहराबाहेरील जुन्या भागाचे झाले आहे.
मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मोरक्कोमधील या भूकंपामुळे संपूर्ण देशभरातून भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
"मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या घटनेत ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे", असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.