रणनितीकार प्रशांत किशोर नवा पक्ष काढणार का?; ट्विट करुन दिले संकेत

काही दिवसांपासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण त्यांन्या काँग्रेससोबतच्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत.
रणनितीकार प्रशांत किशोर नवा पक्ष काढणार का?; ट्विट करुन दिले संकेत
Prashant KishorSaam Tv

नवी दिल्ली: काही दिवसांपासून रणनितीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या संबंधीत त्यांच्या काँग्रेससोबत बैठकाही झाल्या होत्या. पण या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. आता रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी ट्विट करुन नवा पक्ष काढणार असल्याचे संकते दिले आहेत.

प्रशांत किशोर यांच्या ट्विटनंतर (Tweet) चर्चांना जोर आला आहे. लोकशाहीत योगदान देण्‍याची तळमळ आणि लोकांसाठी रणनीती आखण्‍यातील मागील काही वर्षात अनेक चढउतार आले. आता या प्रवासाकडे पाहिलं की वाटतं आता थेट लोकांमध्‍ये जाण्‍याची वेळ आली आहे. जनतेमध्‍ये जावून त्‍यांच्‍या समस्‍या अधिक चांगल्‍याप्रकारे जमजून घेता येतील आणि ‘जन सुराज’च्‍या मार्गावर पुढे वाटचाल करता येईल, असं ट्विट प्रशांत किशोर (Prashant kishor) यांनी केले आहे.

हे देखील पाहा

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये (Congress) जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसाठी सादरीकरण केले. पण काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यातील बोलणी निष्फळ ठरल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही.

प्रशांत किशोर काही महिन्यांसाठी बिहारला जाणार आहेत, ते तेथील लोकांना भेटणार आहेत. आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही राजकीय चळवळ पुढे नव्या राजकीय पक्षात बदलू शकते, असे मानले जात आहे. पण त्याची फक्त सुरुवात आहे. पक्षाचे नावही जन सूरज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशांत किशोर (Prashant kishor) यांनीही आपल्या ट्विटमध्ये तसे संकेत दिले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.