Girl’s Hair Stuck In Generator: धक्कादायक! डीजेवर नाचताना जनरेटरमध्ये अडकले मुलीचे केस, ७०० टाके लागले

Prayagraj News: प्रयागराजमधील सैदाबाद येथील ढोकरी गावात एका तरुणीचे केस जनरेटरच्या पंख्यात अडकल्याची घटना घडली आहे.
Girl’s hair stuck in generator
Girl’s hair stuck in generatorSaam tv

UP News: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. प्रयागराजमधील सैदाबाद येथील ढोकरी गावात एका मुलीचे केस जनरेटरच्या पंख्यात अडकल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुलीच्या डोक्याचे केस मूळापासून निघाले आहेत. या घटनेनंतर तरुणीला रुग्णालयात उपचजारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

या मुलीचे डीजेच्या जनरेटरमध्ये केस अडकल्याने डोळ्यावरील त्वचा देखील निघाली आहे. या तरुणीची प्रकृती नाजूक असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, शस्त्रक्रिया करून त्वचा व्यवस्थित झाली तर ठीक आहे. त्वचा व्यवस्थित नाही झाली तर एका आठवड्यानंतर 'ड्राफ्टिंग सर्जरी' करावी लागणार आहे.

Girl’s hair stuck in generator
Shah Rukh Khan Fulfill Fans Wish: शाहरूख खान बनला कॅन्सर पेशंटसाठी देवदूत; ६० वर्षीय चाहतीची शेवटची इच्छा केली पूर्ण

नेमकं काय घडलं?

सोमवारी रात्री सैदाबादच्या ढोकरी गावात लग्नाची वरात सुरु होती. लोक या वरातीत बेधुंद नाचत होते. याचवेळी गुंजा नावाची मुलीचे केस डीजेच्या जनरेटरमध्ये अडकले. या घटनेत गुंजा ही गंभीर जखमी झाली. या गुंजाला बिकापूरजवळील खासगी रुगणालयात दाखल केले आहे.

गुंजाला एका आठवडा आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. एसएन यादव हे म्हटले की, गुंजाची प्रकृती सध्या ठीक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात गुंजाच्या डोक्याला ७०० टाके लागले आहेत.

Girl’s hair stuck in generator
2000 Rs Note Exchange Today: आजपासून 2000 रुपयांची नोट मिळणार बदलून, बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या या 7 प्रश्नांची उत्तरं

घटनेवेळी नेमकं काय घडलं?

प्रयागराजमधील ही मुलगी १६ वर्षांची असल्याचे सांगण्यात येत आहे. १६ वर्षीय गुंजाचे जनरेटरमध्ये केस अडकल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर गुंजाला लोकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

सध्या तिच्या उपाचार सुरू आहेत. गुंजाचे डोक्यातील जखम भरल्यानंतर तिचं सीटीस्कॅन करण्यात येईल. सीटीस्कॅननंतर पुढील उपचाराची दिशा ठरविण्यात येणार आहे. गुंजा सध्या आयसीयूमध्ये आहे. गुंजाचे कुटुंबीय आणि नातेवाईक तिच्यासाठी प्रार्थना करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com