President Droupadi Murmu: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्राला केलं संबोधित, महिला सशक्तीकरणावर केलं मोठं भाष्य

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले.
Droupadi Murmu
Droupadi MurmuSaam Tv

President Droupadi Murmu News: देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. यावेळी राष्ट्रपती मूर्मू यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भारत ही लोकशाहीची जननी आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला सशक्तीकरणावरही मोठं भाष्य केलं. (Latest Marathi News)

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी यांनी देशाला एक संदेश दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, देशात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर भर देण्यात आला आहे. तर आर्थिक सशक्तीकरणामुळे कुटुंब आणि समाजात महिलांची स्थिती मजबूत होते'.

Droupadi Murmu
Indian Independence Day: राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर

राष्ट्रपती द्रौपदी म्हणाल्या, 'आज महिला देशाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहेत. महिला या देशाचा गौरव वाढवत आहेत. आज महिलांनी अनेक क्षेत्रामध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे. काही दशकांआधी त्यांच्या सहभागाची कल्पना गेली नसती'

Droupadi Murmu
Happy Independence Day: स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी भोगला कारावास; अमरावती कारागृहात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा

'मला आनंद होतोय की,देशात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरण विशेष लक्ष दिलं जातंय. आर्थिक सशक्तीकरणामुळे कुटुंबात आणि समाजात महिलांचं स्थान प्रबळ होत आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

'मी देशवायांना आग्रह करते की, त्यांनी महिला सशक्तीकरणाला प्राथमिकता द्यावी. आपल्या भगिनी आणि मुलींना प्रत्येक अडचणींचा सामना मोठ्या शक्तीने करून जीवनात यशस्वी व्हावं, असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com