ख्रिस्ती धर्मांतरणासाठी वॉर्डनचा दबाव; दबावामुळे 12 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

एका ख्रिश्चन मिशनरी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलमध्ये मला सतत त्रास दिला जात होता. वॉर्डन आपल्याला सतत ओरडायचा, हॉस्टेलमधील सर्व खोल्या साफ करायला लावायचा तसंच ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकायचा असं या मुलीने आरोप केले आहेत
ख्रिस्ती धर्मांतरणासाठी वॉर्डनचा दबाव; दबावामुळे 12 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या
ख्रिस्ती धर्मांतरणासाठी वॉर्डनचा दबाव; दबावामुळे 12 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्याSaam TV

तमिळनाडू : 12 वीमध्ये शिकत असणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्यावरती ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत तिने स्वत: आत्महत्या करण्या आधी एक व्हिडीओ मध्ये या दबावाची माहिती दिली आहे.

तमिळनाडूतील (Tamilnadu) तंजावूर मधील बुदालूर तालुक्यातील एका ख्रिश्चन मिशनरी (Christian missionary) संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलमध्ये मला सतत त्रास दिला जात होता. वॉर्डन आपल्याला सतत ओरडायचा, हॉस्टेलमधील सर्व खोल्या साफ करायला लावायचा तसंच ख्रिस्ती धर्म (Christianity) स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकायचा असं या मुलीने आरोप केले होते आणि हा त्रासच सहन न झाल्याने 9 जानेवारीला या मुलीने हॉस्टेलमध्येच विष पिलं होतं.

ख्रिस्ती धर्मांतरणासाठी वॉर्डनचा दबाव; दबावामुळे 12 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करणार : उदय सामंत

मुलीने विष पिल्याचं समजताच हॉस्टेलच्या आचाऱ्याने तिला एका नर्सकडे नेलं होतं, त्या ठिकाणी तिच्यावरती उपचार केल्य़ानंतर मुलीला तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं होतं. त्यांनी मुलीला 15 तारखेला रुग्णालयात दाखल केल्या दरम्यान मुलीच्या घरच्यांनी पोलिसांना तिने विष पिल्याचं कळवलं.

पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठत मुलीचा व्हिडीओवर जबाब नोंदवून घेतला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही मुलीचा मृत्यूजबाब नोंदवण्यात आला होता असं पोलीस अधीक्षक रावली प्रिया यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला तेव्हा मुलीला त्रास दिला जात असल्याची तक्रार केलेला एक Video व्हायरल होत असल्याचं समजल.

हे देखील पहा -

या व्हिडीओमधील माहितीचा पोलिसांनी तपास केला असता त्यात त्यांना तथ्य आढळले त्यामुळे पोलिसांनी वॉर्डनला अटक केली आहे. हा व्हिडीओ मुलीने रुग्णालयात असताना रेकॉर्ड केला होता. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल करून मुलीची ओळख अशा पद्धतीने सार्वजनिक करणं हे चुकीचं असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) करणाऱ्यां विरोधातही कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.