
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २ मेपासून जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते सुमारे २५ विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचा तीन दिवसांचा दौरा महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सात राष्ट्रांच्या आठ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते विविध देशातील उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. त्यांचा उद्देश त्यांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे, असं पीएमओकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आधी जर्मनी, नंतर डेन्मार्क आणि त्यानंतर ४ मे रोजी परतण्यापूर्वी काही काळ पॅरिसमध्ये थांबणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये एक रात्र थांबणार आहेत. सोमवारी ते बर्लिनमध्ये भारतीयांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहेत. पीएम मोदींच्या भाषणाव्यतिरिक्त काही सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जर्मनीमध्ये राहणारे भारतीय पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आतुर झाले आहेत, असं या कार्यक्रमाचे स्वयंसेवक राजेश नायर म्हणाले.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना त्यांचा हा दौरा होत आहे. या युद्धात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे नुकसान झाले आहे. युक्रेनचे या युद्धामुळे ४० लाखाहून अधिक लोक निर्वासित आहेत. आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. भारतावरही दबाव आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवावा, अशी भारताची इच्छा आहे. या मुद्द्यावर यूएनजीए आणि सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात आणलेल्या ठरावावर मतदानाला भारत अनुपस्थित आहे. भारताने या मुद्द्यावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.