Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द, सूत्रांची माहिती

वाढत्या कोरोनाच्या (Corona)पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोदींचा हा दौरा 28 जानेवारीला होणार होता. दौरा रद्द झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे.
Narendra Modi
Narendra ModiSaam Tv

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोदींचा हा दौरा 28 जानेवारीला होणार होता. दौरा रद्द झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे. (Narendra Modi Pune Visit Cancelled)

हे देखील पहा -

पुण्यात विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. पुणे जिल्हा प्रशासनाकडून या दौऱ्याची तयारी देखील सुरु करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारीला होणारा हा दौरा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, आता दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com