PM Modi News: आईने सांगितलेली 'ती' गोष्ट नेहमी लक्षात राहिल; पंतप्रधान मोदींचं भावूक ट्विट

आईच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान मोदी अहमदाबादकडे रवाना झाले.
PM Narendra Modi's Mother Passed Away
PM Narendra Modi's Mother Passed AwaySaam TV

PM Narendra Modi's Mother Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. आज (30 डिसेंबर) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान मोदी अहमदाबादकडे रवाना झाले. आई हिराबेन मोदी यांच्या आठवणीत मोदींनी भावूक ट्विट केलं आहे. (Latest Marathi News)

PM Narendra Modi's Mother Passed Away
Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं वृद्धापकाळाने निधन

मी जेव्हा आईच्या १०० व्या वाढदिवशी त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. 'बेटा काम करो बुद्धी से और जीवन जिओ शुद्धी से' ही गोष्ट माझ्या नेहमीच लक्षात राहिलं असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. यावरून मोदी आई त्यांच्या आई हिराबेन यांच्यातील नातं किती घट्ट होतं याची प्रचिती मिळते.

दरम्यान, आईच्या निधनाची बातमी कळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीहून अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते अहमदाबाद येथे पोहचतील. बुधवारी मोदी हे आईला भेटण्यासाठी (PM Modi) हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे आईच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

त्या लवकरच बऱ्या होतील, असं डॉक्टरांनी मोदींना सांगितलं होतं. मात्र, आज (30 डिसेंबर) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.

मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या, नंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये ते हिराबेनचे आशीर्वाद घेताना दिसले होते.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com