सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारलं, व्हिडिओ पाहून संताप होईल

उत्तरप्रदेशच्या एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण केली आहे.
सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारलं, व्हिडिओ पाहून संताप होईल

उत्तरप्रदेशच्या लखीमपुरच्या सरकारी शाळेत (Government School) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद होण्याच्या घटना सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याच्या आपण पाहिल्या आहेत. पण उत्तरप्रदेशच्या एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) प्रचंड व्हायरल झाला आहे.

सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारलं, व्हिडिओ पाहून संताप होईल
भाजपनेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिले नाही; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिकेत क्षुल्लक कारणावरुन तुंबळ हाणामारी झाली. मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चक्क चपलेने मारहाण केली आहे. अटेंडन्सवरुन दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटली आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. शाळेच्या वर्गात मुख्याध्यापकाने सर्वांसमोर महिला शिक्षकेचा अवमान करत चप्पलने मारहाण केल्याने या घटनेबाबत निषेध व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

उत्तरप्रदेशच्या खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुंगू खेडा शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर मुख्याध्यापकाला तातडीनं बडतर्फ करण्यात आले आहे. महिला शिक्षिका शाळेत उशीरा आल्याने मुख्याध्यापकाने त्या शिक्षिकेला चपलेने मारहाण केली. सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाने निर्दयीपणे शिक्षिकेचा अवमान केल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून सदर मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती मूलभूत शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी दिली आहे.

पवित्र ठिकाणीच गैरवर्तन

या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक अजित वर्मा हे शाळेत उशिरा आलेल्या महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. त्यावेळी शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी शाळेच्या वर्गात उपस्थित असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे शाळा विद्येचं मंदीर आहे,त्यामुळे अशा पवित्र ठिकाणी मुख्याध्यापकच अशा प्रकारचे गैरवर्तन करत असतील, तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय बोध घ्यावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com