मोदी सरकारने तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथावरून चालण्यास भाग पाडले; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अग्निपथ योजनेला शांततेने विरोध करणाऱ्या लोकांना काँग्रेसचे समर्थन.
मोदी सरकारने तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथावरून चालण्यास भाग पाडले; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Priyanka Gandhi News, Narendra Modi News, Agnipath Scheme News UpdatesSaam TV

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशभरातून विरोध करण्यात येत आहे. विरोध करणाऱ्या आंदोलकांनी काही ठिकाणी रेल्वे रोखल्या आहेत तर काही ठिकाणी रेल्वेचे (Railway) डबे देखील पेटवून दिलेत. बिहारमध्ये (Bihar) या योजनेला मोठ्या प्रमाणाक विरोध केला जात आहे. मात्र या हिसंक आंदोलनामुळे अनेक सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (Agnipath Scheme News Updates)

दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध करत असलेल्या तरुणांना समर्थन देण्यासाठी काँग्रेस नेते, संसद सदस्य जंतर-मंतरवर सत्याग्रह करत आहेत. या वेळी बोलताना प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सांगितलं आहे की, या योजनेला शांततेने विरोध करणाऱ्या लोकांना आमच्या पक्षाचे समर्थन आहे. शिवाय आपल्यापेक्षा मोठा देशभक्त कोणीही नाही. आपण डोळे उघडून नीट पाहा, बनावट राष्ट्रवादी व बनावट देशभक्तांना ओळखा, पूर्ण देश आणि काँग्रेस आपल्या संघर्षात आपल्यासोबत आहे असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं आहे.

हे देखील पाहा -

तसंच यावेळी प्रियांका यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, त्या म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदींनी तरुणांना वारंवार नोकरीची खोटी आशा दाखवत तरुणांना बेरोजगारीच्या अग्निपथावरून चालण्यास भाग पाडलं.' असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. तसंच ८ वर्षांत १६ कोटी नोकऱ्या देण्यात येणार होत्या, पण तरुणांना केवळ पकोडे तळण्याचे ज्ञान मिळाले असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर केली.

दरम्यान, या योजनेला होत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने (Central Government) या योजनेत काही बदल केले आहेत. या योजनेअंतर्गत केवळ ४ वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. तर या योजनेसाठी वयोमर्यादा २१ वर्षे ठेवण्यात आली होती. मात्र, सरकारने या योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत वाढ करत ती २१ वर्षांवरून वाढवून ती २३ इतकी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com