10 बायका, 100 प्रेयसी अन् 5000 मुलींच्या जीवनाचा खेळखंडोबा!

प्रेमवीराला मध्य प्रदेशातून अटक
10 बायका, 100 प्रेयसी अन् 5000 मुलींच्या जीवनाचा खेळखंडोबा!
पाच हजार मुलींची तस्करी करून बनवलं वेश्या!; नराधमाला मध्य प्रदेशातून अटकSaam Tv

इंदूर: मानवी तस्करी Human Trafficking आणि वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजय कुमार दत्त याने पाच हजारांहून अधिक मुलींचा वेश्याव्यवसायात ढकलल्याची कबुली दिली आहे. 25 वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आलेला विजय मुंबईतील नाला सोपारा भागातील एका छोट्या वस्तीत राहत होता. एसआयटीने SIT त्याला साथीदार बबलूसह बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथे राहणाऱ्या उज्ज्वल ठाकूरच्या घरातून पकडले आहे. उज्ज्वल, बबलू आणि सैजलच्या मदतीने त्याला इंदूरला वेश्याव्यवसायाचे केंद्र बनवायचे होते. इंदूरहून सुरत, राजस्थान, मुंबई आणि इतर पर्यटन पॅलेसमध्ये मुलींच्या पुरवठ्याची साखळी तयार करण्याचाही प्रयत्न होता.

हे देखील पहा-

आयजी IG हरिनारायणाचारी मिश्रा यांनी सांगितल्यानुसार, आरोपी विजय कुमार दत्तने चौकशीदरम्यान कबूल केले की, त्याचे मूळ नाव काहीतरी वेगळे आहे. अवैधरित्या भारतात आल्यानंतर तो मुंबईत स्थायिक झाला होता. बनावट मतदार ओळखपत्र आणि आधार ओळखपत्र मिळवण्यासाठी त्याने पासपोर्ट बनवून घेतला आणि पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने तो बांगलादेशला जाऊ लागला.

नोकरीच्या बहाण्याने भारतात बोलावून...;

तस्कराने असेही सांगितले की बांगलादेशातील शबाना आणि बख्तियारच्या माध्यमातून तो गरीब घरातील मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात बोलावून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असे. याआधी बांगलादेशातून येणाऱ्या मुलींना नाला सोपारा आणि इतर ठिकाणी लपवून स्वत: शारीरिक संबंध बनवत असे. विजयने जवळपास 10 मुलींसोबत लग्ने केली आहेत. 100 हून अधिक गर्लफ्रेंड आहेत. त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असे आणि त्याचे कमिशन स्वतःच घेत होता.

पाच हजार मुलींची तस्करी करून बनवलं वेश्या!; नराधमाला मध्य प्रदेशातून अटक
Parle-G ने दिला महागाईचा झटका; किंमतीत 5 ते 10 टक्क्यांची वाढ

दलालांची साखळी बनवली;

इंदूर, धार, अलीराजपूर, झाबुआ, सुरत, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू यासह विविध शहरांतील दलालांची साखळी त्याने तयार केल्याचेही आरोपीने सांगितले. आयजीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना शेकडो मुलींचा हिशेब मिळाला आहे, ज्यांना विजयने दलालांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात पाठवले आहे. पोलिसांनी 4 मुलींनाही ताब्यात घेतले असून त्यापैकी दोन बांगलादेशी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com